NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार

पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर (NEET) फुटीप्रकरणात सीबीआय कारवाईला वेग आला असून नाशिकमधून (Nashik) काल दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकमधून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आज पुण्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. नीटचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर तपासात पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 46 वर्षीय मनिषा ही पुण्यातील (Pune) बिबडेवाडी परिसरात राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचविण्याचं काम केल्याचा संशय आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेनं विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवल्याचा संशय असल्याने पोलिसांनी चौकशीसाठी महिलेला ताब्यात घेतलं. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला ही महिला मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषाच करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणातील नाशिकमधील संशयित शुभम खैरनारला घेऊन CBI टीम मध्यरात्री मुंबईकडे रवाना झाली आहे. CBI ने शुभम खैरनारचा नाशिक पोलिसांकडून ताबा घेतलाय. CBI कडून शुभम खैरनारची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचा शुभम आणि पुण्याचा रहिवासी धनंजय यांनी हे पेपर लीक करण्याचा कट रचला होता. धनंजयने कथितरित्या नीटचा पेपर शुभमला 10 लाख रुपयांना विकला असल्याची माहिती आहे. त्यानंतर शुभमने टेलिग्रामद्वारे तो पेपर 15 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, सीबीआयने कारवाई सुरू केली असून नाशिक, पुणेसह हरियाण, राजस्थान, तेलंगणातही चौकशी केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…