महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याचा मोठा अंदाज, पावसाची प्रतीक्षा संपणार!

भीषण उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या माहितीनुसार, 23 मे रोजी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्ये यशस्वी प्रगती केली आहे. हवामान विभागाने सांगितले की, पुढील 3 ते 4 दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा मोठा भाग आणि उर्वरित अंदमान समुद्र लवकरच मान्सूनच्या प्रभावाखाली येऊ शकतो.
यंदा मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. साधारणपणे 1 जूनला केरळ किनारपट्टीवर पोहोचणारा मान्सून यावर्षी 26 मे रोजीच धडक देऊ शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यामुळे मान्सूनचा वेग वाढला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झाले नसल्याने मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनचा वेग कायम राहिल्यास 5 जूनला गोव्यात, 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक तापलेले शहर ठरले आहे. शनिवारी ब्रह्मपुरी येथे तब्बल 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…