पुण्यात NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी अटक; मुख्याध्यापिका मनीषा हवालदार CBIच्या ताब्यात

देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती आणखी वाढवत पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली आहे. सदाशिव पेठेत राहणाऱ्या मनीषा हवालदार या राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (NTA) भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. याआधी मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता “तिसरी मनीषा” म्हणून हवालदार यांचे नाव समोर आले आहे.
या प्रकरणानंतर सेठ हिरालाल सराफ विद्यालयाचे सचिव सतीश भालचंद्र गवळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मनीषा हवालदार 1992 पासून शाळेत कार्यरत होत्या आणि सध्या त्या मुख्याध्यापिका पदावर होत्या. त्यांना NTA वर तज्ज्ञ म्हणून नेमण्यात आले होते, याची संस्थेला कोणतीही माहिती नव्हती. सीबीआयने शाळेत येऊन सीसीटीव्ही फुटेज, संगणकाच्या हार्ड डिस्क आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून संस्थेकडून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. “मुख्याध्यापिका अशा प्रकारच्या प्रकरणात सहभागी असतील, असे कधी वाटले नव्हते,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सीबीआयच्या तपासानुसार, मनीषा हवालदार यांना भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश होता. याआधी अटक झालेल्या मनीषा मांढरे यांच्या मदतीने काही प्रश्न लीक करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात हेच प्रश्न NEET परीक्षेत आल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. या वेळी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली.
मनीषा हवालदार या गेली 23 वर्षे पुण्यातील लक्ष्मी निवास सोसायटीत राहत असून त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण विदेशात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्या पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार होत्या. दरम्यान, तपास यंत्रणांच्या माहितीनुसार मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे या एकमेकींच्या परिचयातील होत्या आणि त्यांच्यात नियमित संपर्क होता.
NEET पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 11 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे, लातूर, नाशिक, दिल्ली, जयपूर, गुरुग्राम आणि अहिल्यानगर येथे छापेमारी करून सीबीआयने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बँक व्यवहारांची माहिती जप्त केली आहे. लाखो रुपयांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या दलालांचाही तपास सुरू असून अनेक कोचिंग क्लासेस तपासाच्या रडारवर आले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा शिवराज मोटेगावकर याचे अंबाजोगाई कनेक्शनही समोर आले आहे. 2003 च्या सुमारास त्याने अंबाजोगाईमध्ये खासगी क्लासेस सुरू केले होते. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने त्याने नंतर लातूरमध्ये कोचिंग क्लासेस सुरू केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे अंबाजोगाईचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…