मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ

देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाईला झुरळासमान लेखल्यानंतर त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्थापन झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने अवघ्या पाच दिवसांत सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले आहेत. आज (21 मे) गुरुवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत, इन्स्टाग्रामवर हा आकडा 10.5 मिलियनआणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत पोहोचला होता. इन्स्टाग्रामवर भाजपचे 8.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे 13.3 मिलियन आहेत. जितक्या वेगाने कॉकरोच जनता पार्टीला प्रतिसाद मिळत आहे तो पाहता तो देशातील अशांत तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा रंगली आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील मराठी तरुण अभिजीत दीपकेनं केली आहे. अभिजीतने पक्षाचा लोगोही प्रसिद्ध केला आहे. ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी’ हे त्याचे घोषवाक्य आहे. या पक्षाने अवघ्या एका दिवसात 45 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीशांनी आपण असे काहीही म्हटले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या ‘परजीवी’ आणि ‘झुरळ’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “माझे वक्तव्य विशेषतः अशा लोकांसाठी होते, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारे कायद्यासारख्या व्यवसायात शिरले आहेत. अशा लोकांनी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही शिरकाव केला आहे. ते परजीवींसारखे आहेत.” एका खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांना झुरळे म्हटले होते. ते म्हणाले, “काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात, जे नंतर प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात.”

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…