अखेर लिंगपिसाट खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला, उत्तराने सर्वच थक्क

अंधश्रद्धा, फसवणूक आणि अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेला वादग्रस्त ढोंगी बाबा अशोक खरातभोवती आता अंमलबजावणी संचालनालयाचा (ED) पास घट्ट आवळला गेला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खरातला नुकतेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात हजर केले. या हायव्होल्टेज सुनावणीदरम्यान कोर्टात प्रचंड नाट्य पाहायला मिळाले. नेहमी शांत राहणारा खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला, मात्र त्याने दिलेल्या उत्तराने न्यायाधीश आणि वकीलही चक्रावून गेले.
सुनावणीच्या सुरुवातीला ईडीने अशोक खरातची ७ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, ईडीचे तपास अधिकारी न्यायालयासमोर प्रकरणाचे गांभीर्य आणि कोठडीचे नेमके कारण स्पष्ट करू शकले नाहीत. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना सुनावले, “तपास अधिकाऱ्यांना प्रकरण नीट समजावून सांगता येत नाहीये, मग मी कसे समजावून सांगणार की त्यांना नक्की काय हवे आहे?” यानंतर वकिलांनी तातडीने कागदपत्रे हाती घेत तपास अधिकाऱ्यांना कोठडी मागण्याचे ठोस ग्राउंड्स वाचून दाखवण्यास सांगितले.
ईडीच्या वकिलांनी कोर्टासमोर खरातच्या गुन्ह्यांची संपूर्ण कुंडलीच मांडली. खरातने स्वतःला ‘भगवान शिवाचा अवतार’ सांगून लोकांना कसे फसवले, याचे धक्कादायक तपशील समोर आले. लोकांना ब्लॅक मॅजिक (जादू टोणा) आणि जीव जाण्याची भीती घालून पूजेच्या नावाखाली खरातने कोट्यवधी रुपये उकळले. हर्षद पोफळे आणि ललित पोफळे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. तर दिनेश परब यांच्या तक्रारीनुसार, विविध विधींच्या नावाखाली ५ कोटींहून अधिक रुपये उकळून खरातने स्वतःसाठी गाड्या खरेदी केल्या आणि फार्महाऊस बांधले. तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डचाही त्याने गैरवापर केला. खरातच्या नावावर तब्बल ६० बँक खाती सापडली आहेत, ज्यामध्ये कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. खरातने एका खात्यातून ३२ लाख रुपये आपली पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यावर पाठवले. आतापर्यंत ईडीला खरातच्या तब्बल ७० मालमत्ता सापडल्या असून, त्यातील अनेक मालमत्ता पत्नी कल्पनाच्या नावावर खरेदी केल्या आहेत. अशोक खरातने चौकशीत सहकार्य न केल्याने आणि कोट्यवधी रुपयांच्या या महाघोटाळ्याचा मुख्य स्त्रोत (Source of money) शोधणे गरजेचे असल्याने न्यायालयाने ईडीचा युक्तिवाद ग्राह्य धरला. न्यायालयाने अखेर २६ मे पर्यंत अशोक खरातला ईडी कोठडी सुनावली आहे. या कोठडीदरम्यान ईडी खरातच्या ६० बँक खात्यांमधील पैशांचे गूढ आणि ७० मालमत्तांचे जाळे उघडकीस आणणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…