बँकेने सील केलेले सहारे कुटुंबाचे घर शिवसेनेने काही तासांत खुले केले!

धामणगाव रेल्वेत शिवसेनेची मध्यस्थी; गरोदर महिला व अर्धांगवायूग्रस्त रुग्ण असलेल्या कुटुंबाला दिलासा

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील जळका पटाचे येथील सहारे कुटुंबावर आर्थिक संकटामुळे बेघर होण्याची वेळ आली होती. एस.आर.जी. स्मॉल फायनान्स बँकेने कर्जवसुलीसाठी कुटुंबाचे घर सील केल्याने कुटुंबीयांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे, घरात गरोदर महिला आणि अर्धांगवायूग्रस्त रुग्ण असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने परिसरात चिंता व्यक्त होत होती.

या परिस्थितीत सहारे कुटुंबाने शिवसेनेकडे मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही बँकेकडून कारवाई सुरू असल्याचा दावा कुटुंबीयांनी केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकरणात हस्तक्षेप केला. शिवसेना जिल्हाप्रमुख आशिषभाऊ धर्माळे, तालुकाप्रमुख निलेश तिवारी, योगेश थाळे, दिलीपभाऊ ठाकरे आणि पंकज राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बँकेच्या कारवाईबाबत संबंधितांशी चर्चा करून घर पुन्हा खुले करण्यासाठी मध्यस्थी करण्यात आली. शिवसैनिकांच्या हस्तक्षेपानंतर अवघ्या काही तासांत सहारे कुटुंबाला घराचा ताबा पुन्हा मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला.

आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ नये. कर्जवसुली करताना बँकांनी मानवी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. सहारे कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याची भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली. या वेळी युवासेना तालुकाप्रमुख शुभम ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हॉकी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी स. गुरमीतसिंघ नवाब यांचा सत्कार

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य हॉकी इंडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ बाबूसिंघ नवाब (डिंपल) यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ भाजपा नेते अरविंद भारतीया तसेच खालसा क्लबच्या माजी खेळाडूंच्या वतीने…

शृंग-गिरि विद्यारण्य वेदपाठशाळेची नाशिकमध्ये स्थापना

नाशिक : शुक्ल यजुर्वेदाच्या अध्ययनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये आता ‘शृंग-गिरि विद्यारण्य वेदपाठशाळे’ची स्थापना करण्यात येणार आहे. दक्षिणाम्नाय श्री शृंगेरी शारदापीठाधीश्वर शंकराचार्य श्री विधुशेखर भारती यांनी याबाबत घोषणा केली. या…