नेहरू बालसदन, वानाडोंगरी येथे सदिच्छा भेट; आनंदाची उधळण आणि हास्याची देवाणघेवाण

मुलांसोबत संवाद साधत खाऊचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपण्याचा यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम

नागपूर,  राजेंद्र पहाडे (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई), नागपूर येथील रसायनशास्त्र विभागातर्फे विभागप्रमुख डॉ. पी. यू. वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. श्रुती गोमकाळे यांच्या समन्वयातून वानाडोंगरी येथील नेहरू बालसदन येथे सामाजिक उपक्रमांतर्गत सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये करुणा, सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांची भावना विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमात विभागातील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांनी साई आश्रमातील मुलांसोबत आनंददायी वेळ घालवला. मुलांशी संवाद साधला आणि प्रेम व आपुलकीचे प्रतीक म्हणून त्यांना खाऊचे वाटप केले. मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि त्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे ही भेट सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली. या संवादातून गरजू व्यक्तींना मदत करणे, इतरांसोबत आनंद वाटून घेणे आणि माणुसकी जपणे यांचे महत्त्व अधोरेखित झाले. तसेच या उपक्रमामुळे सहानुभूती, कृतज्ञता, सांघिक भावना आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन मिळाले. मुलांनाही आनंदाचे आणि आपुलकीचे क्षण अनुभवता आले. रसायनशास्त्र विभाग आणि केमिकल सोसायटीने या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. भविष्यातही अशा अर्थपूर्ण सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजाप्रती आपले योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…