अनेक शेतकऱ्यांची ॲपच्या तांत्रिक अडचणींमुळे पीक पाहणीची नोंदच नाही; तोपर्यंत दुष्काळ मदत पंचनाम्यांची मुदत संपली?

पंचनामे न करता सरसकट दुष्काळी मदत देण्याची मागणी

अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली जाते. पूर्वी तलाठ्यांकडून प्रत्यक्ष पीक पाहणी करून सातबारा उताऱ्यावर नोंद केली जात असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने पीक पाहणी करण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे.

यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस न झाल्याने शासनाने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला असून, शेतातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या पंचनाम्यांची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. ॲपच्या माध्यमातून पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात नेमलेल्या सहाय्यकांच्या माध्यमातूनही अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या पीक पाहणीची नोंद होऊ शकलेली नाही. काही शेतकऱ्यांच्या ॲपमध्ये नोंदी झाल्या असल्या, तरी त्या सातबारा उताऱ्यावर दिसून येत नाहीत.

दुष्काळी मदतीसाठीच्या पंचनाम्यांची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने मदतीची घोषणा केली असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळाची झळ सोसत असताना या अडचणी कशा दूर होणार, असा सवालही शेतकरी करत आहेत. गावपातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या अडचणी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने ठोस निर्णय घेऊन पंचनाम्यांची अट न ठेवता, प्राप्त परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी मदत द्यावी आणि ती तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…