निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

मुंबई. राज्यात महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात केली होती. त्यानुसार, शेतकऱ्यांना जून महिन्यात कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, आता शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा बाकी आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे, विधान परिषद निवडणुकीनंतर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी यांच्यासंदर्भात माहिती दिली. शेतकरी कर्जमाफी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चिली जाईल. मात्र, निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं आहे की, तुम्ही घोषणा करू नका. त्यामुळे, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आज चर्चा होईल, निर्णय होईल, निर्णयानुसार कारवाई होईल. मात्र, कुठलीही घोषणा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती. पुढील 10 दिवसांत कर्जमाफीचा निर्णय होईल, असे भरणे यांनी म्हटले होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी, अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. त्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचे समजते.

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या
राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून कर्जमाफीची सातत्याने मागणी केली जात होती. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्याचा, परिणाम कर्जफेड न केल्याने सावकाराच्या ओझ्याखाली शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. बळीराजाला या कर्जापासून दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील किती शेतकऱ्याना या योजनेचा लाभ मिळणार, त्यातील अटी व शर्ती संदर्भात अद्याप कुठलीही माहिती नाही.

अपात्र बहिणींची संख्या 80 लाखांवर गेली
लाडकी बहीण योजना सुरु झाल्यावर आपण केवायसी सुरु केलं. या योजनेत सरकारी कर्मचारी आहेत, त्यासंदर्भात माहिती घेतली. परिवहन विभाग आहे, चारचाकी डेटाबेसची माहिती घेतली आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं, की 5 लाख असे आहेत ज्यांकडे चारचाकी आहे. 14 हजार पुरुषही योजनेतील लाभार्थी निघाले आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न अधिक आहे, असे पण काहीजण निघाले. केवायसी करून घ्या सांगितलं, मात्र ती अद्याप झाली नाही. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेतील अपात्रांची संख्या 80 लाखांवर गेली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…