“पूरमुक्त मुंबईचा संकल्प! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर महापालिकेची करडी नजर”.

मुंबईला पूरमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. पंपिंग स्टेशन आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे बळकटीकरण करण्यासोबतच पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पावसाच्या काळात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. शहरातील नालेसफाईची कामे जवळपास पूर्ण झाली असून, उर्वरित कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. याशिवाय जलनिस्सारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात येत असून, संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…