नागपूर पोलिसांमधील रायटर आणि डिफॉल्टर कर्मचाऱ्यांना आता गार्ड ड्युटी!

पोलिस आयुक्तांचा धडक निर्णय

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधि ) : शहरामध्ये गुन्हेगारांसोबत साटेलोटे ठेवून बेकायदेशीर धंद्यांना अभय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि कर्तव्यात सातत्याने कुचराई करणाऱ्या डिफॉल्टर कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या रायटर आणि इतर कर्मचाऱ्यांना आता मोकळे रान मिळणार नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने गार्ड ड्युटी तसेच इतर कडक बंदोबस्ताच्या कामांवर तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार केली असून, आता खात्यांतर्गत चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. रस्त्यांवर होणारे गुन्हे रोखणे, अमली पदार्थांच्या विळख्यातून नागपूर शहराला मुक्त करणे आणि महिला तसेच मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, या तीन प्रमुख उद्दिष्टांवर सध्या जोर दिला जात आहे. या मोहिमेत काही पोलीस कर्मचारी अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक ठाण्यांमधील रायटर आणि काही डिफॉल्टर कर्मचारी अवैध व्यावसायिक तसेच सराईत गुन्हेगारांशी हातमिळवणी करून काम करत असल्याच्या तक्रारी होत्या. तडजोड करून आर्थिक लाभ मिळवणे आणि वसुलीवर लक्ष केंद्रित करणे, असा आरोप या कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. या साखळीमुळे बेकायदेशीर धंद्यांना छुपी मदत मिळत असल्याचेही सांगितले जात आहे.

या सर्व प्रकाराची दखल घेत पोलिस आयुक्तांनी सर्व सहाही परिमंडळांच्या पोलिस उपायुक्तांना कडक सूचना दिल्या आहेत. जे कर्मचारी आपले मुख्य काम सोडून इतर अनावश्यक कामांमध्ये रस दाखवतात, त्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याची जाणीव करून देत बंदोबस्तात पाठवावे, प्रसंगी त्यांना गार्ड ड्युटी द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात एका ठाणेदारांच्या रात्रपाळीदरम्यान घडलेला प्रकारही समोर आला होता. ठाणेदारांसोबत असलेल्या एका रायटर कर्मचाऱ्याने प्रकृती खराब असल्याचे कारण देत ड्युटीवर जाण्यास नकार दिला. मात्र, प्रत्यक्षात तोच कर्मचारी रात्रभर शहरातील विविध भागांमध्ये आपल्या इतर साथीदारांसोबत फिरत असल्याचे समोर आले. दुसऱ्या दिवशी संबंधित ठाणेदारांनी या कर्मचाऱ्याला जाब विचारला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याच्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कडक पावले उचलण्यात आली आहेत.

पत्रकाराचे मत : पोलीस दलातील अंतर्गत स्वच्छता ही अतिशय गरजेची बाब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कडक उपाययोजना राबवल्यास सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकते. खाकी वर्दीवरील डाग दूर करण्यासाठी अशा कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…