पुणे, राजन शेळके ( प्रतिनिधी ) : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने तीन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यानुसार सोमवारपासून देशभरातील बँका बंद राहण्याची शक्यता होती. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रविवारी (दि. २७) सर्व बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देशभरातील बँकांच्या सर्व शाखा सुरू ठेवण्यात आल्या.
मात्र, सोमवारपासून बँका बंद राहणार की काही प्रमाणात कारभार सुरू राहणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात बँक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनने पुणे जिल्ह्यातील १४० पैकी ५५ शाखा सुरू राहतील, असा दावा केला आहे.


