दुष्काळ निवारणासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नगर तालुक्यात दौरा

अनुलोम मित्रांनी दुष्काळ निवारण कार्यात पुढाकार घ्यावा; तहसीलदार मिलिंद कुलथे यांचे आवाहन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख): नगर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच गावागावांतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी अनुलोम मित्रांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने काम करावे, असे आवाहन नगरचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी केले.

अनुलोम परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळ, टंचाई व निवारण बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या बैठकीत नगर तालुक्यातील विविध गावांमधील दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा आणि भविष्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले की, प्रत्येक गावातील पाण्याची उपलब्धता, पाणीटंचाईची तीव्रता आणि त्यावर करता येणाऱ्या उपाययोजनांची माहिती अनुलोम मित्रांनी संकलित करावी. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाझर तलावांमधील गाळ काढणे, तलावांची पाणीसाठवण क्षमता वाढविणे, जुन्या विहिरी व नद्यांचे पुनरुज्जीवन करणे आणि जलसंधारणाची कामे लोकसहभागातून राबविणे गरजेचे आहे.

गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची नेमकी परिस्थिती काय आहे, कोणत्या भागात टँकरची आवश्यकता आहे, उपलब्ध जलस्रोत किती काळ पुरू शकतात आणि भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी कोणती कामे हाती घेता येतील, याचा आढावा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता पाण्याचे नियोजन, जलस्रोतांचे संवर्धन आणि पुनर्भरण यावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

रोजगार, पशुधन आणि शासकीय योजनांवर चर्चा

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, पशुधनासाठी चारा व पाण्याचे नियोजन करणे, ग्रामपंचायत स्तरावर पाणीटंचाईचा आढावा घेणे आणि उपलब्ध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. गावपातळीवर लोकसहभाग वाढवून पाणी वाचविणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे आणि गरजू नागरिकांना आवश्यक मदत मिळवून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अधिकारी व अनुलोम पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीस अनुलोमचे अहिल्यानगर विभाग जनसेवक शिरीष भालेकर, उपविभाग प्रमुख दीपक रोहोकले, विधानसभा प्रमुख राम भालसिंग, प्रसाद थोटे, अमोल अवस्थी आणि पृथ्वी तांबे उपस्थित होते. तसेच तालुका गटविकास अधिकारी अक्षय जी. गार्डे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी मुकुंद राजळे आणि जलसंधारण अधिकारी तृप्ती पाटील यांचीही उपस्थिती होती. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रशासन आणि अनुलोम मित्रांनी समन्वयाने नियोजनबद्ध व गतिमान पद्धतीने काम केल्यास गावागावांतील पाणीटंचाई कमी करण्यासाठी मदत होईल. जलसंधारण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…