अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील मंगरूळ गावचे रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ कोंडाजी खामकर (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या खामकर यांच्या निधनाने मंगरूळसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात ते ‘आमदार’ या नावाने परिचित होते.
धोंडीभाऊ खामकर यांनी वनविभागात सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्ती घेतली होती. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्यातील आपला सहभाग कायम ठेवला. गावातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मनमिळाऊ स्वभाव आणि सामाजिक कार्यातील योगदानामुळे त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने मंगरूळ गावाने सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.


