डॉ. सुभाष सोमण यांना राज्यस्तरीय ‘आरोग्यदूत’ पुरस्कार जाहीर

५८ वर्षांच्या अविरत आरोग्यसेवेचा होणार गौरव; वयाच्या ८२ व्या वर्षीही रुग्णसेवा सुरू

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख): कोतूळ, ता. अकोले येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुभाष केशव सोमण यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘आरोग्यदूत’ सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात गेल्या ५८ वर्षांपासून अविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. सोमण यांच्या कार्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी रुग्णसेवेचे व्रत कायम ठेवले आहे.

अहिल्यानगर येथे गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपल्या कर्तृत्वातून आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

डॉ. सोमण यांनी वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणानंतर ग्रामीण तसेच दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. अनेक वर्षांपासून सुरू असलेली त्यांची रुग्णसेवा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही सेवाभाव जपत वैद्यकीय सेवा देत असल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुरस्कार निवड समितीने त्यांच्या दीर्घकालीन वैद्यकीय सेवेची आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. सोमण यांना पुरस्कार जाहीर झाल्याने कोतूळसह अकोले तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…