दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य; आ. अमरनाथ राजूरकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय; महाराष्ट्र सरकारच्या मदतीचे केले स्वागत

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : गेल्या पाच दशकांत अनुभवला नाही, अशा भीषण दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर आले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पाणी, पीक आणि चारा नियोजनासोबतच उद्योगांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील साडेतीन लाख कुटुंबांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होऊन बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे, अशा शब्दांत आमदार राजूरकर यांनी समाधान व्यक्त केले. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या यंत्रणांनाही मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद दिली आहे. पिण्याचे पाणी आणि पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करत दुष्काळाचा सामना करण्याची तयारी फडणवीस सरकारने केली असून, त्यातून एक आदर्श निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.

 शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून केवळ अडीच हजारांची मदत फडणवीस सरकारने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मात्र दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची केवळ अडीच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करून बोळवण केली आहे, याकडे आमदार राजूरकर यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने जाहीर केलेली मदत कर्नाटकापेक्षा दुप्पट आहे. महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली असताना कर्नाटक सरकार मात्र अजूनही केंद्राकडून मदत मिळण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे तेथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात ही तुटपुंजी मदत तरी वेळेवर मिळेल का, याबाबत शंकाच असल्याचे ते म्हणाले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…