जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था असून, शेतकरी, कष्टकरी आणि दूध उत्पादकांसाठी भक्कम आधारस्तंभ म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट व्हावी, शेतकऱ्यांचे हित जपले जावे आणि बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सक्षम आर्थिक आधार मिळावा, अशी अपेक्षा डॉ. विखे यांनी यानिमित्ताने केली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अमृत संस्थेअंतर्गत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह गड-दुर्गांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी दिवाळीत महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेअंतर्गत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत…

ग्रामपंचायत मूलभूत सुविधा अभियानाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून १४ तालुक्यांचा आढावा

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधि): आज जिल्हा परिषद अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत मूलभूत सुविधा अभियान तसेच गटविकास अधिकारी…