ग्रामपंचायत मूलभूत सुविधा अभियानाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून १४ तालुक्यांचा आढावा

अभियानातील सात उद्दिष्टांनुसार पूर्ण, प्रगतिपथावरील व प्रलंबित कामांचा आढावा; आवश्यक कामांची अंदाजपत्रके तयार ठेवून तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधि): आज जिल्हा परिषद अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत मूलभूत सुविधा अभियान तसेच गटविकास अधिकारी यांची समन्वय सभा आयोजित करण्यात आली.

या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत मूलभूत सुविधा अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या पूर्ततेचा सविस्तर आढावा घेतला. अभियानातील सात उद्दिष्टांनुसार पूर्ण झालेली, प्रगतिपथावर असलेली तसेच प्रलंबित कामांची तालुकानिहाय माहिती घेण्यात आली. आगामी काळात प्राधान्याने हाती घ्यावयाच्या कामांची आवश्यक अंदाजपत्रके पूर्वतयारीने तयार ठेवावीत, जेणेकरून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच कामांना तातडीने सुरुवात करून अभियानाच्या अंमलबजावणीला गती देता येईल, असे नियोजनही यावेळी करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मूलभूत सुविधांनी संपृक्त करण्याच्या उद्देशाने आरोग्य, एकात्मिक बाल विकास, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम आणि वीज विभाग यांच्या समन्वयातून हे अभियान राबविण्यात येत आहे. विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करून अभियानाची उद्दिष्टे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर यावेळी भर देण्यात आला. या समन्वय सभेला जिल्हा परिषद अमरावतीचे सर्व खातेप्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अमृत संस्थेअंतर्गत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह गड-दुर्गांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी दिवाळीत महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेअंतर्गत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत…

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान…