अमृत संस्थेअंतर्गत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह गड-दुर्गांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी दिवाळीत महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेअंतर्गत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी 2025 मध्ये अमृत दुर्गोत्सव उपक्रमातून ‘जागतिक विश्वविक्रमाची’ नोंद झाली. चला, पुन्हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड-दुर्गांचा गौरव जपूया, शिवशौर्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया आणि दुर्गसंस्कृतीचे संवर्धन करूया!

ऑनलाईन नोंदणी दि. 01 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2026 दरम्यान

[https://amrutdurgotsav.com](https://amrutdurgotsav.com?utm_source=chatgpt.com)

या सांकेतिक स्थळावर नोंदणी करता येणार आहे.

गड-दुर्गाची प्रतिकृती तयार करणे व अपलोड करणे

दिवाळी सुट्ट्यांमध्ये गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या लोकपरंपरेस प्रोत्साहन देणे, दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तसेच, बालगोपाळ, युवक, कुटुंबे तसेच समाजातील विविध घटक यांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गाच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या इतिहासाची व शौर्यपरंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, ही या उपक्रमामागील प्रमुख संकल्पना आहे. या माध्यमातून ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान, जतनाची भावना व सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दुर्गोत्सवामध्ये जगातील कोणताही व्यक्ती/कुटुंब/गृहसंकुल/संस्था/गट/शाळा/महाविद्यालय इत्यादी सहभागी होऊ शकतात.

नागरिकांनी घराचे अंगण, गृहसंकुलातील उपलब्ध सार्वजनिक जागा, बाग, बाल्कनी किंवा अन्य योग्य व सुरक्षित ठिकाणी कुटुंबातील सदस्य, बालगोपाळ व मित्रपरिवार यांच्या सहभागातून दुर्गाची प्रतिकृती तयार करावी. महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालय यांना देखील या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून शाळा/महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दुर्गांची प्रतिकृती तयार करता येईल.

दुर्गाची प्रतिकृती तयार करताना उपलब्ध साहित्याचा सर्जनशील व पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. प्रतिकृतीची मांडणी, सजावट, ऐतिहासिक संदर्भ व सादरीकरण यामध्ये सहभागी नागरिकांना त्यांच्या कल्पकतेनुसार स्वातंत्र्य राहील.

सहभागी व्यक्तीने तयार केलेल्या दुर्गाच्या प्रतिकृतीसोबत स्वतःचे छायाचित्र (Selfie/Photograph) काढून ते अमृत दुर्गोत्सवाच्या अधिकृत डिजिटल व्यासपीठावर अपलोड करावे.

पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीला डिजिटल “अभिनंदन पत्र” उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर अभिनंदन पत्र वैधता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर [https://www.amrutdurgotsav.com/](https://www.amrutdurgotsav.com/?utm_source=chatgpt.com) या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. त्यासाठी आवश्यक डाउनलोड लिंक/सूचना संबंधित सहभागीच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येईल.

संकट रयतेवर होतं… चिंता राजाला होती.

दुष्काळाच्या कठीण काळात रयतेला सावरण्यापासून ते स्वराज्याला सक्षम करण्यापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्याच्या केंद्रस्थानी होती रयत आणि तिचं हित.

त्या रयतेच्या राजाची दूरदृष्टी, स्वराज्य उभारण्याची जिद्द आणि लोककल्याणाचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो.

यंदा दुर्ग घडवताना केवळ इतिहासाची प्रतिकृती नको, तर त्या विचारांप्रती आपली कृतज्ञता घडवूया. मातीच्या प्रत्येक कणातून शिवरायांचे स्मरण करूया… प्रत्येक दुर्गातून त्यांच्या कार्याला मानवंदना देऊया… कारण हा केवळ दुर्ग नाही, ही रयतेच्या राजाला दिलेली आपली मानवंदना आहे.

चला, कृतज्ञतेचा दुर्ग घडवूया!

अमृत दुर्गोत्सव 2026

अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

रयतेचा विचार • स्वराज्याचा वारसा • शिवरायांना मानवंदना.

अहिल्यानगर अमृत कार्यालय संपर्क क्र. : 9112228769

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान…

ग्रामपंचायत मूलभूत सुविधा अभियानाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून १४ तालुक्यांचा आढावा

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधि): आज जिल्हा परिषद अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत मूलभूत सुविधा अभियान तसेच गटविकास अधिकारी…