चंद्रपूर-गडचिरोलीत हत्ती-मानव संघर्ष तीव्र; विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत चाललेल्या हत्ती-मानव संघर्षाचा मुद्दा काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून विशेष टास्क फोर्स स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात व्याहाड-सोनापूर मार्गावर २ जुलै रोजी रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा मृत्यू झाला. जीव वाचविण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्तीने पाठलाग करून त्यांना चिरडले. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, त्यांच्या मतदारसंघात घडलेल्या या घटनेसह आतापर्यंत हत्तींच्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
सध्या ३० ते ३२ हत्तींचा कळप चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वावरत असून शेतपिके, घरे आणि झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वन विभागाकडून केवळ हत्ती हाकलण्याचे प्रयत्न केले जात असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हत्ती-मानव संघर्ष हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हत्तींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवावे, नागरिकांना वेळेवर इशारे देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी आणि या प्रश्नासाठी स्वतंत्र विशेष टास्क फोर्स स्थापन करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच खाणकाम व जंगलातील अधिवासावर झालेल्या परिणामांमुळे हत्तींचे पारंपरिक मार्ग बदलल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विधानसभा अध्यक्षांनी हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे सांगत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मानवी जीवितहानी होत असेल तर शासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याबाबत शासनाने कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबाबत सभागृहात निवेदन सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…