गोदावरी नदीच्या घाटावर सफाई मोहीम

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महापालिकेने गुरुवारी विशेष सामूहिक श्रमदान उपक्रम राबविला. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदीच्या गोवर्धन घाटावर स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली.

सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि शेकडो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू व टोपले घेऊन श्रमदान केले. नदीच्या घाटावरील प्लास्टिक कचरा, निर्माल्य, ओला-सुका कचरा तसेच घाटावर वाढलेली झाडेझुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

शासनाच्या या आवाहनाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, नागरिक, महिला तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले. मोहिमेची सांगता सामूहिक स्वच्छता शपथ घेऊन करण्यात आली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…