अनाथांचा नाथ… मदतीचा हात!

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, मुलींना सायकली; २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

परभणी,  नीलेश कांमतीकार (प्रतिनिधि) : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्तीचे औचित्य साधून, ‘सेवा संकल्प अभियानाची’ सुरुवात परभणीतून करण्याचा मान शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी परभणीला दिला.

परभणीसह संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या संकटाला सामोरा जात असताना, केवळ आश्वासने न देता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला. याच भावनेतून आज दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, गरजू मुलींना सायकली वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम ठिकाणी याची सुरुवात केली. याचबरोबर २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज परभणीच्या भूमीतून करण्यात आले. या रुग्णवाहिका मराठवाड्यातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा शिवसेनेचा विचार आहे. याच भावनेतून संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे काम शिवसेनेने कायम केले आहे.

आजच्या कार्यक्रमात मी एकनाथ शिंदे साहेबांकडे परभणीच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. परभणी हा कायम दुष्काळाचा सामना करणारा जिल्हा आहे. त्यामुळे परभणीत मोठा उद्योग आणून पाच-दहा हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, नाट्यगृहासाठी निधी द्यावा, महानगरपालिकेच्या रखडलेल्या निधीचा प्रश्न मार्गी लावावा तसेच मानवत तालुक्यातील पाण्यापासून वंचित ६५ गावांसाठी जायकवाडीचे पाणी एअरलिफ्ट करून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. परभणीच्या विकासासाठी यापूर्वीही शिंदे साहेबांनी १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज त्यांनी परभणीच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. उद्योगधंदे उभारण्यासाठी मागील महिन्यातच उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांना सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी तिजोरी ही शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा शब्द आज एकनाथ शिंदे साहेबांनी दिला.

दुष्काळ आणि आत्महत्येमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांतील महिला व तरुणींशी मा. एकनाथ शिंदे साहेबांनी आज स्वतः आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या परिस्थितीची आस्थेने विचारपूस करत, “मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका,” असा विश्वास दिला. संकटाच्या काळात या कुटुंबांच्या पाठीशी शासन आणि शिवसेना ठामपणे उभी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार सईद खान, संपर्कप्रमुख आनंद जाधव, बालाजी पाटील खतगावकर, परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी व कष्टकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, माता-भगिनी आणि नागरिकांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला साथ दिली. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…