विकसित भारताच्या संकल्पासाठी एकजुटीचा निर्धार!

अहिल्यानगरमध्ये भाजपची ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या राष्ट्रसेवेच्या २५ वर्षांच्या प्रेरणादायी वाटचालीच्या निमित्ताने अहिल्यानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात पार पडली.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, आत्मनिर्भरता आणि जनकल्याणाच्या दिशेने घेतलेली झेप निश्चितच प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर शहरातून ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली. शहरातील महापुरुषांना अभिवादन करून माळीवाडा येथील विशाल गणपतीची आरती करण्यात आली. तसेच मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, यासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री अहिल्यानगर व महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री मा. ना. राधाकृष्णजी विखे पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार श्री. अक्षय कर्डिले, आमदार श्री. विवेक कोल्हे, जिल्हाध्यक्ष श्री. नितीन दिनकर, श्री. दिलीप भालसिंग, उपमहापौर श्री. धनंजय जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा, सुशासन आणि विकासाच्या माध्यमातून विकसित भारत घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…