अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाले कार्यकर्ते; नांदेडमध्ये जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व. अजित पवारांना श्रद्धांजली; कार्यकर्त्यांनी केला आठवणींना उजाळा

नांदेड :  महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष, वसंतनगर येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विनम्र अभिवादन केले. अजितदादांच्या कार्याची, त्यांच्या नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण काढताना अनेक कार्यकर्ते भावुक झाले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,  प्रणिताताई देवरे-चिखलीकर, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, कार्यालयीन सरचिटणीस श्रीधरराव नागापूरकर, युवक शहराध्यक्ष मोहसीन खान पठाण, मनपा गटनेते साबेर चाऊस, नगरसेवक हबीब बावजीर, युवक कार्याध्यक्ष माधव चिंचाळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जमीर पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “दरवर्षी आम्ही अजितदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत होतो. मात्र यावर्षी ते आपल्यात नसल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याची वेळ आली आहे. त्यांचे कार्य, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम कायम प्रेरणा देत राहील. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.” कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचे स्मरण करत त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादांच्या आठवणींनी भारलेल्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…