अंबाबाई मंदिरात बॅरिकेडिंगवरून वाद; श्रीपूजकांचे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर, राजन शेळके ( प्रतिनिधी) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बॅरिकेडिंगवरून वाद झाला. पहाटे पाचच्या सुमारास अंबाबाईची उत्सवमूर्ती मंदिरात नेत असताना बॅरिकेड्सजवळ पोलिसांनी अडवल्याने श्रीपूजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. श्रीपूजकांनी मंदिरातच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सुरक्षेच्या कारणास्तव अंबाबाई मंदिर परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मात्र, या व्यवस्थेमुळे भाविकांसह श्रीपूजकांचीही गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला. सोमवारी पहाटे श्रीपूजकांना देवीची उत्सवमूर्ती मंदिरात नेण्यापासून पोलिसांनी रोखल्याने गोंधळ निर्माण झाला.

परिसरातील छोट्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनाही बॅरिकेडिंगचा त्रास सहन करावा लागत असल्याचे श्रीपूजकांनी सांगितले. धार्मिक विधी पार पाडताना पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणेकडून अडथळे निर्माण होत असतील, तर नवरात्रोत्सवातील बॅरिकेडिंगच्या नियोजनावर फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राज्य में सूखे का संकट, किसानों को ₹5,000 की अग्रिम मदद; CM फडणवीस ने दिया भरोसा

महाराष्ट्र में सूखे की मार झेल रहे किसानों के लिए राज्य सरकार ने मदद का भरोसा दिया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया है कि संकट की इस घड़ी…

महाराष्ट्र-गोवा सीमा चेकपोस्ट पर ACB की छापेमारी, ₹13,070 की नकदी जब्त

बांदा : महाराष्ट्र-गोवा सीमा पर स्थित आबकारी विभाग के चेकपोस्ट एक बार फिर चर्चा में हैं। भ्रष्टाचार की शिकायतों और चेकपोस्ट पर कथित तौर पर पैसे लेने के आरोपों के…