Today Gold Price : सोन्याच्या दरात मोठा बदल, ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली

सोन्याच्या बाजारात पुन्हा एकदा चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम आणि चिंता वाढली आहे.
20 जून 2026 रोजी सकाळी 9वाजता Goodreturns वेबसाइटवरील ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर यांसह विविध शहरांमध्ये सोन्याचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये काही प्रमाणात शांतता दिसून येत असली तरी सोन्याच्या दरातील चढ-उतार अजूनही कायम आहेत.
मागील चार दिवसांमध्ये सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती आणि सोनं जवळपास 6,000 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र आज पुन्हा परिस्थिती बदलली असून दर वाढल्याने बाजारात हालचाल जाणवते आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1,46,080 रुपये इतका आहे, तर प्रति ग्रॅम 14,608 रुपये दर नोंदवला गेला आहे. कालच्या तुलनेत आज 24 कॅरेट सोनं 10 ग्रॅममागे 220 रुपयांनी महागलं आहे. काल हा दर 1,45,860 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचबरोबर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोनं आज 10 ग्रॅमसाठी 1,33,900 रुपये असून 18 कॅरेट सोनं 1,09,560 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जात आहे. दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात अनुक्रमे 200 आणि 170 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात मात्र स्थिरता दिसून येत आहे. आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलो इतका कायम आहे. मात्र जून महिन्यात चांदीच्या दरात जवळपास 30,000 रुपयांची मोठी घसरण झाल्याचेही समोर आले आहे. एकूणच सोन्याच्या बाजारात सुरू असलेली ही अस्थिरता ग्राहकांसाठी निर्णय घेणे कठीण करत असून, पुढील काही दिवसांत दर कसे बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

गणपतीपुळ्यात मोठी दुर्घटना; समुद्रात गेलेल्या ८ पर्यटकांपैकी ५ जण बेपत्ता, शोधमोहीम सुरू

रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून फिरण्यासाठी आलेल्या ८ पर्यटकांपैकी ५ जण समुद्रात बेपत्ता झाले असून ३ जणांना…

BEST संपाचा फटका मुंबईकरांना; बससेवा ठप्प, लोकल-मेट्रोत प्रवाशांची प्रचंड गर्दी

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम असल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. बेस्टच्या बहुतांश बस रस्त्यावर उतरल्या नसल्याने लाखो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा…