E20 पेट्रोलवर गडकरींचे मोठे स्पष्टीकरण; जुन्या गाड्यांतील ‘हा’ पार्ट कंपन्यांना मोफत बदलण्याचे आदेश

Nitin Gadkari on E20 Petrol : देशभरात E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याचा आणि मायलेज कमी होत असल्याचा वाद सुरू असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होत नसल्याचे त्यांनी सांगितले असून, जुन्या वाहनधारकांचे नुकसान होऊ नये म्हणून वाहन कंपन्यांना महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत.
गडकरी यांनी सांगितले की, E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होत नसल्याचे त्यांचे मत आहे. मात्र, काही जुन्या वाहनांमध्ये मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. फ्लेक्स-फ्युअल वाहनांवर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.अलीकडेच एका युट्यूबरच्या टोयोटा इनोव्हा कारमध्ये इथेनॉलमिश्रित इंधनामुळे टाकी आणि इंजिनमध्ये पाणी गेल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर E20 पेट्रोलच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वाहन उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून इथेनॉलमुळे अशा प्रकारचे नुकसान होत नसल्याचे सांगितले होते.
दरम्यान, या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना पत्र लिहून 2023 पूर्वी तयार झालेल्या वाहनांमध्ये E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी झाले किंवा इंजिनचे नुकसान झाले, तर ग्राहकांना भरपाई देणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.या सर्व घडामोडींमध्ये गडकरी यांनी जुन्या वाहनधारकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, जुन्या वाहनांमध्ये पूर्वी वापरले जाणारे धातूचे वॉशर्स इथेनॉलच्या संपर्कात आल्यास खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता वाहन सर्व्हिसिंगसाठी आल्यावर संबंधित कंपन्यांनी हे धातूचे वॉशर्स आधुनिक रबर वॉशर्सने पूर्णपणे मोफत बदलून द्यावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. गडकरी यांच्या या घोषणेमुळे जुन्या वाहनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, E20 पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चेला यामुळे नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…