लाडक्या बहिणींच्या खात्यावर ₹१५०० जमा; तुमच्या खात्यात आले का पैसे?

जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात; घरबसल्या बॅलन्स तपासण्याचे सोपे मार्ग

राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा ₹१,५०० हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले असून, लाभार्थींमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील महिलांनी सेतू केंद्रे, अंगणवाड्या आणि ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यावर डीबीटी (DBT) द्वारे थेट रक्कम पाठवली जात आहे. पहिल्या टप्प्यात लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून, उर्वरित लाभार्थींनाही पुढील २ ते ३ दिवसांत हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तरीही खात्यात पैसे दिसत नसतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. शासनाकडून रक्कम टप्प्याटप्याने वर्ग केली जात असल्याने पुढील २४ ते ४८ तासांत उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यातही पैसे जमा होऊ शकतात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक (Aadhaar Seeding) असणे आणि खात्यात डीबीटी सेवा सक्रिय असणे आवश्यक आहे. आधार लिंक नसल्यास जवळच्या बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घरबसल्या पैसे तपासण्यासाठी बँकेशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला मेसेज पाहा, अधिकृत बँक अॅपमध्ये लॉग इन करून स्टेटमेंट तपासा किंवा पासबुक अपडेट करा. तसेच Google Pay, PhonePe किंवा Paytm सारख्या अॅपमधूनही बँक बॅलन्स तपासता येऊ शकतो.जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने अनेक लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. महागाईच्या काळात मिळणारी ही मदत घरखर्चासाठी उपयोगी पडत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

दिग्गज तेलुगु अभिनेत्री पवला श्यामला का निधन, सिनेमा जगत में शोक

तेलुगु फिल्म इंडस्ट्री की वरिष्ठ अभिनेत्री पवला श्यामला का मंगलवार  को 75 वर्ष की उम्र में निधन हो गया। हैदराबाद के उस्मानिया जनरल अस्पताल में इलाज के दौरान उन्हें दिल…

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…