९ जुलैला शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन; अनेक शाळांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाअंतर्गत शिक्षक सामूहिक रजा घेऊन शाळा बंद ठेवण्याचा प्रयत्न करणार असून, मुंबई येथेही आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शिक्षक अभियोग्यता (TET) परीक्षेमुळे निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीच्या संधी हिरावल्या जाणे, संच मान्यता धोरणातील त्रुटी तसेच बीएलओ (BLO) नियुक्तीबाबत शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समितीसह इतर समविचारी शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत. या संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात ३० जून रोजी राज्य शासनाला आंदोलनाची नोटीस दिली होती.
शिक्षक संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षण संचालक, पुणे यांनी सुरू केलेली विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करणे, संबंधित वादग्रस्त पत्र रद्द करणे तसेच त्या पत्राच्या आधारे ज्या जिल्ह्यांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय टीईटीमुळे निर्माण झालेल्या सेवा विषयक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
शिक्षकांच्या सामूहिक रजेच्या आंदोलनामुळे राज्यातील अनेक शाळांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व शाळा बंद राहणार असल्याचा कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित शाळेकडून कामकाजाबाबतची माहिती घेऊनच पुढील नियोजन करावे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…