दुष्काळाची तीव्रता वाढली; तातडीच्या उपाययोजनांसाठी भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर; सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तसेच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

भाजपचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तसेच माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शामराव पिंपळे, संतोष म्हस्के, रमेश पिंपळे, युवराज पोटे, विद्या शिंदे, गायताई माने, अर्चना चौधरी, बाळासाहेब पोटघन, डॉ. अजित फुंदे, सुनील म्हस्के, हर्षवर्धन धामणे, सोपान कुलांगे, संदीप परभाणे, गणेश भालसिंग, हनुमान बंड, आकाश ढाकणे, पाराजी माने, सुयोग धामणे, सुनील उमाप, राम पानमळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मुंबई लोकल फिर ठप! हार्बर लाइन पर ओवरहेड वायर में खराबी

मुंबई : मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर तकनीकी खराबी के कारण प्रभावित हुई। कुछ दिन पहले ही मध्य रेलवे के ठाणे-मुलुंड के बीच सिग्नल…

लाडली बहनों का इंतजार होगा खत्म? नवंबर के पहले सप्ताह में खाते में आएंगे ₹1500!

महाराष्ट्र की लाखों महिलाओं के लिए मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना से जुड़ी अहम खबर सामने आई है। सितंबर महीने की किस्त का इंतजार कर रही महिलाओं को जल्द राहत…