पीएफ खातेदारांना दिलासा; लवकरच खात्यात जमा होणार ८.२५% व्याज

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफवरील ८.२५ टक्के व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील ८ कोटींहून अधिक पीएफ खातेदारांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा होणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाची बचत योजना मानली जाते. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशभरातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना ८.२५ टक्के दराने व्याज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. हे व्याज आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कर्मचारी आणि नियोक्त्यांनी जमा केलेल्या निधीवर लागू होणार आहे. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी ईपीएफवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत आणखी वाढ होणार असून त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे.
यावेळी व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. ईपीएफओने अलीकडेच आपल्या डेटाबेस प्रणाली आणि सॉफ्टवेअरचे आधुनिकीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे यापूर्वीप्रमाणे टप्प्याटप्प्याने अनेक आठवडे वाट पाहण्याची गरज भासणार नसून, खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जलद जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदाच्या मार्च महिन्यात ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. जून २०२६ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर आता खातेदारांच्या खात्यात व्याज जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…