७२ वर्षीय महिलेच्या पोटातून काढली १५ किलो वजनाची अंडाशयाची गाठ; विखे पाटील रुग्णालयातील डॉक्टरांना यश

तीन तास चालली आव्हानात्मक शस्त्रक्रिया; रुग्णाची प्रकृती उत्तम

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  अहिल्यानगर येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डॉक्टरांच्या पथकाने एका ७२ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १५ किलो वजनाची अंडाशयाची गाठ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या काढली. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेली ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुमारे तीन तास चालली. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती उत्तम असून तिच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.

संबंधित महिलेच्या पोटात मोठ्या आकाराची गाठ तयार झाली होती. या गाठीमुळे पोटावर मोठा ताण निर्माण झाला होता. तसेच श्वास घेणे, लघवी करणे आणि शौचास जाणे यांसारख्या दैनंदिन क्रियांमध्येही तिला त्रास होत होता. तपासणीनंतर ही अंडाशयाची गाठ असल्याचे निदर्शनास आले. गाठीचा प्रचंड आकार आणि ती आजूबाजूच्या इतर अवयवांना चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया आव्हानात्मक ठरणार होती.

या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अद्वैत वैद्य आणि मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. दीपक गाडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शस्त्रक्रियेदरम्यान गाठ इतर अवयवांना चिकटलेली असल्याने डॉक्टरांना विशेष काळजी घ्यावी लागली. रुग्णाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डॉक्टरांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली आणि सुमारे १५ किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढली.

रुग्णाचे वाढते वय, गाठीचा मोठा आकार आणि इतर अवयवांशी असलेली चिकटण या बाबींमुळे ही शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र, डॉक्टरांचे कौशल्य, योग्य उपचारनियोजन आणि रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. माननीय नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने रुग्णालयात सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गोरगरीब रुग्णांनाही दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य, वैद्यकीय अनुभव आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

सहकारमहर्षी पद्मश्री श्यामरावजी कदम यांच्या नावाने उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण व्हावे!

डॉ. हंसराज वैद्य समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाच्या विकासाला नवी दिशा देतात. कृषी, सहकार, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मश्री सहकारमहर्षी श्यामरावजी कदम हे अशाच…

एसटी यात्रियों के लिए जरूरी खबर! समय पर बनवा लें NCMC कार्ड, वरना अटक सकती है किराये में छूट

अगर आप महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम (MSRTC) की बसों से सफर करते हैं और किराये में मिलने वाली छूट का लाभ उठाते हैं, तो यह खबर आपके लिए बेहद…