Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण; २४ कॅरेट १० ग्रॅमचा भाव ₹१,४६,७३० वर, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना आज काहीसा ब्रेक लागला आहे. ३ जुलै रोजी उच्चांक गाठल्यानंतर आज (४ जुलै) सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. २४ कॅरेट सोन्याच्या १०० ग्रॅमच्या दरात तब्बल ₹२,७०० ची घट झाली असून १० ग्रॅम (१ तोळा) सोन्याचा भाव ₹१,४६,७३० वर आला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण काहीसा दिलासा देणारी मानली जात आहे. आजचे सोने-चांदीचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबईतील आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेट सोने
– १ ग्रॅम – ₹१४,६७३
– ८ ग्रॅम – ₹१,१७,३८४
– १० ग्रॅम – ₹१,४६,७३०
– १०० ग्रॅम – ₹१४,६७,३००
२२ कॅरेट सोने
– १ ग्रॅम – ₹१३,४५०
– ८ ग्रॅम – ₹१,०७,६००
– १० ग्रॅम – ₹१,३४,५००
– १०० ग्रॅम – ₹१३,४५,०००

१८ कॅरेट सोने
– १ ग्रॅम – ₹११,००५
– ८ ग्रॅम – ₹८८,०४०
– १० ग्रॅम – ₹१,१०,०५०
– १०० ग्रॅम – ₹११,००,५००

प्रमुख शहरांतील प्रति ग्रॅम सोन्याचे दर

पुणे
– २४ कॅरेट – ₹१४,६७३
– २२ कॅरेट – ₹१३,४५०
– १८ कॅरेट – ₹११,००५

दिल्ली
– २४ कॅरेट – ₹१४,६८८
– २२ कॅरेट – ₹१३,४६५
– १८ कॅरेट – ₹११,०२०

नाशिक
– २४ कॅरेट – ₹१४,६७६
– २२ कॅरेट – ₹१३,४५३
– १८ कॅरेट – ₹११,००८

चेन्नई
– २४ कॅरेट – ₹१४,९४६
– २२ कॅरेट – ₹१३,७००
– १८ कॅरेट – ₹११,४४०

बाजारातील चढ-उतारांमुळे सोन्याचे दर दररोज बदलत असतात. त्यामुळे सोने खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित ज्वेलर्सकडून त्या दिवसाचा अंतिम दर आणि जीएसटीसह इतर आकारणीची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…