SBI Job Update : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेकडून Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी एकूण 84 रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (लॉ) आणि उपव्यवस्थापक (लॉ) या पदांचा समावेश आहे. सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 20 जागा निश्चित करण्यात आल्या असून उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे. तर उपव्यवस्थापक पदासाठी 29 जागा असून या पदासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे ठेवण्यात आली आहे.याशिवाय, SBI कडून बँक मेडिकल ऑफिसर पदासाठीही स्वतंत्र भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी 35 जागा उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 24 जून 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी SBI च्या अधिकृत करिअर पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
अर्ज कसा कराल
इच्छुक उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन CRPD/SCO/2026-27/02 किंवा 03 ही संबंधित अधिसूचना निवडावी. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून अर्ज भरावा व आवश्यक फी भरून प्रक्रिया पूर्ण करावी.
महत्त्वाचे
भरतीसंदर्भातील शैक्षणिक पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया आणि इतर अटी यांची सविस्तर माहिती SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही भरती एक चांगली संधी मानली जात आहे.


