आषाढी एकादशीसाठी एसटीचे विशेष नियोजन; वारकऱ्यांसाठी १६ जादा बसफेऱ्या, पंढरपूरकडे जाण्यास सोय

ठाणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी २० ते ३० जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी एकूण १६ जादा एसटी बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. या गर्दीचा विचार करून प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावा, यासाठी एसटी प्रशासनाने विविध मार्गांवर अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, शहापूर, मुरबाड, वाडा तसेच बोरीवली येथून या विशेष बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये बोरीवली (नॅन्सी कॉलनी)-सायन-पंढरपूर, ठाणे-फलटण-पंढरपूर, भिवंडी-कल्याण-फलटण-पंढरपूर अशा विविध मार्गांचा समावेश आहे.तसेच शहापूर-ठाणे-फलटण-पंढरपूर, कल्याण-विठ्ठलवाडी-नगर-फलटण-पंढरपूर, मुरबाड-कल्याण-नगर-फलटण-पंढरपूर, विठ्ठलवाडी-नगर-फलटण-पंढरपूर आणि वाडा-ठाणे-पुणे-पंढरपूर या मार्गांवरही प्रत्येकी विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
या सर्व जादा फेऱ्यांसाठी संगणकीय आणि समूह आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरक्षणाची स्थिती दररोज तपासून आवश्यकतेनुसार अतिरिक्त व्यवस्था केली जाणार आहे. २५ ते ३० जुलैदरम्यान पंढरपूरच्या चंद्रभागा बसस्थानकातून परतीच्या प्रवासासाठीही विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…