कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात बुधवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. तारातला परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत अचानक कोसळल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे.ही घटना तारातला येथील ट्रान्सपोर्ट डेपो रोड परिसरात घडली. अपघाताच्या वेळी गोदामात मोठ्या संख्येने मजूर काम करत होते. छत कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि प्रशासनाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरी संरक्षण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.बचावकार्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मोठ्या क्रेन, जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत काही मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जड लोखंडी संरचना हटवण्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छत कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
कोलकात्यात निर्माणाधीन गोदामाचे छत कोसळले; ४० हून अधिक मजूर अडकल्याची भीती, ५ जणांचा मृत्यू
अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…
बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद
नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…


