रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृह नूतनीकरणासाठी प्रशासनाचा निर्णय

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या नूतनीकरणासह तातडीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने मंदिर प्रशासनाने पुढील एक महिना मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १८ जून ते १८ जुलै २०२६ या कालावधीत रामदरा मंदिरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. दुरुस्तीच्या कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारच्या पूजा, धार्मिक विधी, उत्सव किंवा इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मंदिराकडे येण्याचे टाळावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे अध्यक्ष १००८ महंत हेमंत पुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी गर्भगृहाचे नूतनीकरण करण्यात येत असून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर पुन्हा दर्शनासाठी कधी खुले होईल, याबाबतची अधिकृत माहिती ट्रस्टकडून जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल मंदिर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सर्व भक्त, भाविक आणि शिष्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Related Posts

मुंबई-नाशिक महामार्गावर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आर.सी. पाटील पुलाजवळ घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे…

47 लाखांच्या बिलासाठी लाचेचा सापळा; मनपाचा अधिकारी एसीबीच्या ताब्यात

अमरावती : अमरावती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. श्वान निर्बिजीकरण व लसीकरण कार्यक्रमाचे 47 लाख रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी मोठ्या रकमेची…