कांदा कापल्यावर अश्रू येणार नाही अशी लोक आंदोलन करतायत- फडणवीस

इराण आणि अमेरिका युद्धाचे परिणाम भारतात बघायला मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा बघायला मिळतोय. यादरम्यानच सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला. इंधन दरवाढीमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली. आज सीएनजीचे भाव वाढले. जर इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस चालले तर त्याचे वाईट परिणाम जगातील अनेक देशांना भोगावे लागतील. मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले होते की, राज्यात पुढील एक महिना पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होण्यामागची कारणेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या मुद्द्यावर मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कांद्याच्या दरात कालच केंद्राकडून 3.50पैसे वाढ करण्यात आली. कांदा प्रश्नी उद्या संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. काही लोक विनाकारण यासंदर्भात राजकारण करु पाहतायत. तुमच्या काळात कांद्याचा दराचा प्रश्न होता. विरोधकांचं आंदोलन राजकीय आंदोलन असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, कांदा कापल्यावर अश्रू येणार नाही अशी लोक आंदोलन करतायत. उद्या दिल्लीत कांद्यासंदर्भात बैठक आहे. कांदा कापल्यावरही विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, असेही त्यांनी म्हणत जोरदार टीका केली. कांद्याच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी नुकताच यावर म्हटले की, शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून आज शेतकऱ्यांची एकजूट झाली. शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित आहे. कांद्याला 5 ते सहा रुपये भाव मिळत आहे. हा दर परवडणारा नाही 18 रुपये उत्पादन खर्च आहे. आता कांद्या प्रकरणात दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…