डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला

कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्तानाट्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या सगळ्यात आणखी एक नवा ‘फॉर्म्युला’ समोर आला असून राज्यात तब्बल 4 उपमुख्यमंत्री नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दलित, ओबीसी, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातून प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. दलित गटातूनजी.परमेश्वरा आणि प्रियांक खर्गे यांची नावं चर्चेत आहेत. ओबीसी गटातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचं नाव पुढे आलं आहे. लिंगायत समाजातून M. B. पाटील आणि ईश्वर खांद्रे यांना संधी मिळू शकते. तर अल्पसंख्याक गटातून के.जे. जॉर्ज, यू.टी. खादर आणि जमीर अहमद खान यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, गुरुवारी बेंगळुरूमधील ‘कावेरी’ या सरकारी निवासस्थानी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात होणाऱ्या ब्रेकफास्ट मिटिंगमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नेतृत्व बदलाबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2025 मध्येही दोन्ही नेत्यांमध्ये अशीच चर्चित ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली होती. त्या वेळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान पक्षाने एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.
सूत्रांच्या दाव्यानुसार, राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचा सल्ला दिला असून डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे. बदल्यात सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका आणि त्यांचे पुत्र यतींद्र यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे.
याशिवाय, औपचारिक घोषणेपूर्वी सिद्धरामय्या हे मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत डिनर बैठक घेऊ शकतात. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, डीके शिवकुमार समर्थकांनी त्यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे पोस्टर्स आणि सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…