एसटी बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अन्य 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, स्थानिकांच्या मदतीने या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर चाललेल्या चारचाकी गाडीला ओव्हरटेक करताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस खड्यात पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुजाळवाडी परिसरात घडली आहे. कल्याण -अहिल्यानगर महामार्गावर हा भीषण एसटी अपघात घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. एसटी बस खड्ड्यात पलटी झाली. या अपघातामध्ये चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान या अपघातामध्ये 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिकांच्या मदतीने तातडीने जखमींना आळेफाटा परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत बसचा वाहक देखील जखमी झाला आहे.
समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि एसटी बस थेट खड्ड्यात पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तसचे 25 जण जखमी झाले, दरम्यान अपघात घडल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्यानं काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर ती पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली. दरम्यान या अपघातामध्ये बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. चालकाची घाई प्रवाशाच्या जीवावर बेतली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…