मुंबईतील तब्बल 79 नगरसेवकांवर टांगती तलवार; निवडीविरोधात कोर्टात याचिका

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात मोठी माहिती समोर आली असून तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणांपैकी अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सदर माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून देण्यात आली आहे. गलगली यांनी निवडणुकीनंतर विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची माहिती मागवली होती. त्यानंतर पालिकेच्या विधी खात्याने अधिकृत माहिती उपलब्ध करून दिली. उपलब्ध माहितीनुसार, प्रभाग 119 ‘एस’ मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका लघुन्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र उर्वरित अनेक प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश-
न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये विविध पक्षांच्या आणि विविध प्रभागांतील नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये ‘एच/पूर्व’, ‘के/पूर्व’, ‘एस’, ‘एम/पूर्व’, ‘एफ/उत्तर’, ‘आर/उत्तर’, ‘पी/दक्षिण’, ‘जी/उत्तर’ यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांतील निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार, मतमोजणीतील आक्षेप, उमेदवारी अर्जांबाबतचे वाद तसेच निवडणूक नियमांचे उल्लंघन अशा विविध मुद्द्यांवरून या याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक याचिका दाखल झाल्याने आगामी काळात न्यायालयीन निर्णयांचा महापालिकेच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी सुनावण्यांकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेत कुणाची किती नगरसेवक?
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या. भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी, पुढील प्रमाणे आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…