सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक

रायगड: आजचा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा आनंदाचा क्षण आहे, सर्वांच्या साक्षीने आज रायगडमधील (Raigad) विकासकामांचे भूमिपूजन झाले असे म्हणत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. अजित दादांनंतर मला येथील विकासकामाच्या कार्यक्रमासाठी बोलवून जो पायंडा ठेवलाय, तो पुढे सुरूच राहील असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. रोहामधील विकासकामांमधून तरुणांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येथे अदिती माझी मुलगी म्हणून काम पाहते आहे, दादानंतर मी जबाबदार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिल. दादांसारखेच माझं देखील तटकरे कुटुंबावर तितकेच प्रेम राहील, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. तर, सुनेत्रा पवार यांची संपूर्ण भारतात वहिनी म्हणून ओळख होणार आहे, असे भाकीत सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्या भाषणात केले.
रायगड हा केवळ जिल्हा नाही तर ही शिवराज्याभिषेक झालेली पवित्र भूमी आहे, कोकण म्हणजे साक्षात देवभूमी कष्टाळू माणसाने घडवलेली ही भूमी आहे. दादांचे कोकणावर विशेष जास्त प्रेम राहिले, कोकण हा विकासाचा महाराष्ट्राचा महत्त्वाचा कणा आहे. अजित दादा आणि मी सहलीला जाण्यासाठी निघालो तरी पहिला प्राधान्य आमच कोकणात असायचे, असे म्हणत जुन्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात सुनेत्रा पवार आणि अजित दादांच्या कामाचं भरभरुन कौतूक केलं.
रायगड जिल्ह्यातील विकासावर भाष्य करताना, भविष्यात रायगडमध्ये येणारे पर्यटक गोव्याला विसरुन कोकणात येतील असे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहतील, असे सुनिल तटकरे यांनी म्हटलं. तसेच, तामिळनाडूतील जयललीता, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करीत भारतात पहिल्या वहिनी म्हणून सुनेत्रा पवार यांची ओळख निर्माण होईल, असे भाकितगी तटकरे यांनी आपल्या भाषणात केलं.
अजित दादांच्या उपस्थितीशिवाय रोहा शहरातील कोणतेच काम झाले नव्हते, अजित दादा विकासाभिमुख नेतृत्व म्हणून महाराष्ट्राने अनुभवले. महाराष्ट्राने वसंतदादा पाहिले, दादा पाहिले आता विकासदृष्टी ठेवणाऱ्या वहिनी काम पाहतील. आज तुमचं स्वागत करताना एका डोळ्यात अश्रू आहेत, असे भावनिक उद्गारही तटकरे यांनी काढले.कोकणातील निसर्गचक्री वादळाचा तडाखा बसला, त्या काळात अजित दादांनी मदत करण्याच्या कामांचा तडाखा लावला होता. दादांनी रेवस रेड्डी, करंजा येथील कामाच्या बाबतीत पाठपुरावा केला. राज्याच्या हिताच्या प्रकल्पाचा दादा नेहमीच आढावा घ्यायचे. जात पात न ठेवणारा नेता म्हणजे अजित दादा असं राज ठाकरे म्हणाले होते, दादांसारखे मनमिळाऊ आणि हसवणारे नेते होणे नाही. बारामती हे रोल मॉडेल असून देशातील पहिले मॉडेल असल्याचा उल्लेख अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वी केल्याचंही सुनील तटकरेंनी म्हटलं.
आम्ही रात्री 2 वाजता बारामतीमध्ये फिरत होतो तेव्हासुद्धा झाडांना पाणी घालण्याचे काम सुरू होते. त्यातून दादांचा धाक दिसत होता. दादा आर्थिक शिस्तीचे पालन करायचे, विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच काटेकोरपणे राहायचे. अजित दादांनी दिवेआगर येथील मूर्ती चोरी प्रकरण त्वरीत हाताळले, आज तशीच मूर्ती पुन्हा सर्वांसाठी आहे. रायगड जिल्ह्यात दादांच्या नेतृत्वाखाली यश मिळवता आले, वाहिनीच्या हस्ते आज झालेली विकासकामे ही खरं तर सुरुवात आहे. राज्याच्या आणि देशाच्या पहिल्या वहिनी या सुनेत्रा पवार आहेत, असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…