गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या

जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. गुणरत्न सदावर्ते आज जालना दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षा चालकांच्या संदर्भात मराठी अमराठी यावादावर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यवार टीका केल्यानंतर जालन्यात मनसैनिक आक्रमक झाले होते. चंदनझिरा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…