ठाणे महिला व बालविकास निधीत ७३ कोटींचा कथित गैरव्यवहार; चौकशीचे आदेश, मंत्री आदिती तटकरे यांचा इशारा

ठाणे. जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन निधीत सुमारे ७३ कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मावळ तालुक्यातील किवळे येथील कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केले की, महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला निधी गैरमार्गाने वापरणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घडामोडीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…