नांदेडच्या भूमिकन्येचा राष्ट्रीय सन्मान! स्वाती चौहान-ठक्कर यांची भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या राष्ट्रीय व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती

नांदेड : नांदेडच्या भूमिकन्या तथा माजी न्यायाधीश सौ. स्वाती अभय चौहान-ठक्कर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मानाचा बहुमान प्राप्त केला आहे. भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या (Indian Red Cross Society) राष्ट्रीय व्यवस्थापन मंडळाच्या (National Managing Board) सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून ३ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्तीपत्रानुसार, भारतीय रेडक्रॉस सोसायटी कायदा १९२० मधील कलम 4B(1)(b) अन्वये भारताचे राष्ट्रपती तथा भारतीय रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष यांच्या वतीने त्यांची राष्ट्रीय व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा कार्यकाळ १५ ऑक्टोबर २०२७ पर्यंत राहणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय रेडक्रॉस सोसायटीचे सरचिटणीस ललित वाधवा यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे.

देशातील आपत्तीग्रस्त, गरजू, वंचित आणि असुरक्षित घटकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या राष्ट्रीय व्यवस्थापन मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. देशातील मानवतावादी सेवाकार्याला दिशा देणे, संस्थेच्या कार्याला मार्गदर्शन व सहकार्य करणे आणि समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविणे या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. न्यायक्षेत्रातील अनुभव, सामाजिक जाणीव, सार्वजनिक जीवनातील योगदान आणि मानवतावादी दृष्टिकोन यांच्या बळावर स्वाती चौहान-ठक्कर यांनी मिळविलेला हा राष्ट्रीय सन्मान नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील राष्ट्रीय सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. नांदेडच्या मातीतून राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले हे कर्तृत्व केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून संपूर्ण नांदेडच्या सामाजिक प्रतिष्ठेचा गौरव आहे!

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC उम्मीदवारों के लिए बड़ी खुशखबरी! 16 हजार से ज्यादा पदों पर भर्ती का रास्ता साफ?

महाराष्ट्र में सरकारी नौकरी की तैयारी कर रहे लाखों युवाओं के लिए बड़ी राहत की खबर सामने आई है। महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) की ग्रुप-C परीक्षा 2026 में पदों…

सातारा के 34 हजार से अधिक किसानों का कर्ज माफ, चौथी सूची जारी

सातारा : खेती के लिए लिया गया कर्ज किसान के लिए कई बार बड़ी चिंता बन जाता है। ऐसे में कर्जमाफी की खबर हजारों किसानों के लिए राहत लेकर आई…