बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि अलविरा मोशन एन्टरटेन्मेंटतर्फे कलाकारांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप

पुणे ,राजन शेळके (प्रतिनिधी) : बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि अलविरा मोशन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिराच्या कॅफेटेरियामध्ये दिवाळी कलाकार स्नेहमेळावा आणि सरंजाम किट वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांसह कलाकारांनाही बसत आहे. गावोगावी होणाऱ्या यात्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवरही याचा परिणाम होत आहे. परिणामी कलाकारांचा आर्थिक ताळमेळ बिघडून त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कलाकारांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि कार्यकारिणीने कलाकारांना दिवाळी सरंजाम किट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी या उपक्रमाची पूर्तता करण्यात आली. कलाकारांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हीच या उपक्रमाची खरी पावती ठरली.

या कार्यक्रमाला जगद्गुरुकृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर (संस्थापक अध्यक्ष, जगद्गुरू विश्वकल्याण फाऊंडेशन), डॉ. संजय चोरडिया (संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन), दीपाली कांबळे (सीईओ, अलविरा मोशन एन्टरटेन्मेंट, निर्माती व अभिनेत्री), तृप्ती देसाई (संस्थापक अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड), दत्तात्रय पी. येमूल (संस्थापक, पेशवाई क्रिएशन्स, पुणे), राजेश कामठे (मुख्य व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर व सांस्कृतिक केंद्र, पुणे महानगरपालिका), रोहन कुंभार (रोहन कुंभार प्रॉडक्शन) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलाक्षेत्रातील विविध विभागांमधील कलाकारांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आले. बॅकस्टेज कलाकार, लोकधारा, लावणी, नाटक, ऑर्केस्ट्रा, चित्रपट, लोककलावंत, जादूगार, साऊंड, लाईट आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या आवाहनाला कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमित पोतदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना लता शर्मा यांनी मोलाचे सहकार्य केले.

बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून कलाकारांसाठी आरोग्य विमा पॉलिसी, कलाकार माता-पिता सन्मान सोहळा, महिला कलाकारांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, गरजूंना आर्थिक मदत, तीन दिवसीय बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन सोहळा, दिवाळी सरंजाम किट वाटप तसेच सुमारे १५ दिवसांचे शासकीय मोफत योजना शिबिर असे विविध उपक्रम राबवले जातात. नाममात्र ५०० रुपये शुल्क आकारून कलाकारांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

या सर्व उपक्रमांमध्ये संस्थेचे सभासद उत्साहाने सहभागी होतात. बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले भैय्यासाहेब आणि संपूर्ण कार्यकारिणी समर्पित भावनेने या उपक्रमांसाठी कार्यरत असते. कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर, कलाकार, सभासद तसेच सहकार्य करणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हॉकी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी स. गुरमीतसिंघ नवाब यांचा सत्कार

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य हॉकी इंडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ बाबूसिंघ नवाब (डिंपल) यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ भाजपा नेते अरविंद भारतीया तसेच खालसा क्लबच्या माजी खेळाडूंच्या वतीने…

शृंग-गिरि विद्यारण्य वेदपाठशाळेची नाशिकमध्ये स्थापना

नाशिक : शुक्ल यजुर्वेदाच्या अध्ययनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये आता ‘शृंग-गिरि विद्यारण्य वेदपाठशाळे’ची स्थापना करण्यात येणार आहे. दक्षिणाम्नाय श्री शृंगेरी शारदापीठाधीश्वर शंकराचार्य श्री विधुशेखर भारती यांनी याबाबत घोषणा केली. या…