भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित पाठसादरीकरण स्पर्धेत डीऑन जोसेफ प्रथम

पुणे,राजन शेळके (प्रतिनिधी) : रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या अध्यापक महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित ‘राजगड करंडक’ पाठसादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला.

संस्थेचे अध्यक्ष संग्रामदादा थोपटे व सचिव स्वरूपाताई थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे एस.एन.डी.टी. होम सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय थोरात यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

यावेळी डॉ. गणेश चव्हाण यांनी ब्रिटिशकालीन शिक्षणव्यवस्था कारकून निर्माण करणारी असल्याचे सांगत भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेचे महत्त्व विशद केले. भारताच्या शाश्वत विकासासाठी भारतीय ज्ञानपरंपरेचा उपयोग शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. प्रदीप थोपटे यांनीही भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व सांगितले.

स्पर्धेसाठी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. अतुल गायकवाड व डॉ. मनोज बोराटे यांनी, तर अंतर्गत परीक्षक म्हणून डॉ. स्मिता भामरे व सहायक प्राध्यापक लीना पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता मलारा यांनी केले. समन्वयक म्हणून डॉ. किरण अबनावे, सहायक प्राध्यापक सिमी कौल व डॉ. सचिन मकवान यांनी जबाबदारी पार पाडली. डॉ. अश्विनी भांडवले व सहायक प्राध्यापक विनया बनसोडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

स्पर्धेत रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या अध्यापक महाविद्यालयाचा डीऑन जोसेफ याने प्रथम क्रमांक पटकावला. अभिनव शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मैत्रेयी पाठक हिने द्वितीय, तर संत ज्ञानेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, आळंदी येथील रोहिणी इचके हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना अरणेश्वर अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चौगुले व डॉ. प्रदीप थोपटे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मनपा आयुक्त आणि मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई निवारणाचा आढावा; महापौरांच्या दालनातच बैठक

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत नांदेड शहराला ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी…

फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांवर हल्ले; कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली सुरक्षा

नांदेड, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कर्जवसुलीच्या मुद्द्यावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांना घेराव घालणे आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी…