फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांवर हल्ले; कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली सुरक्षा

कर्जवसुलीला स्थगिती देण्यासाठी शासन निर्णय (जीआर) काढण्याचीही मागणी

नांदेड, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कर्जवसुलीच्या मुद्द्यावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांना घेराव घालणे आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सुरक्षेची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. फायनान्स कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी सामान्य आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच अनेक महिला कर्मचारीही या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यालयांवरील हल्ले आणि तोडफोडीच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण आहे. शेतीशी निगडित कर्जाबाबत शासनाने यापूर्वी निर्णय घेतला असल्यास त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, गृहकर्ज आणि इतर पात्र कर्जांच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यासाठी शासनाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी समन्वय साधावा. यासाठी आवश्यक शासन निर्णय (जीआर) किंवा नियमानुसार योग्य निर्देश जारी करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

अशा निर्णयामुळे कर्जदारांना दिलासा मिळण्यासोबतच फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील तणाव कमी होण्यास मदत होईल. तसेच कार्यालयांमध्ये होणारी तोडफोड, धमकावणे आणि हिंसक प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना मंगेश शिंदे, व्यंकटेश पाटील, बालाप्रसाद शिंदे, विलास राठोड, जगदीश हिंगणे, पांडुरंग करपे, विजय भोसले, दीपक कल्याणकर, गजानन देसाई, पांडुरंग धोंडगे यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते. हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नांदेड पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मनपा आयुक्त आणि मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई निवारणाचा आढावा; महापौरांच्या दालनातच बैठक

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत नांदेड शहराला ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी…

राजगड दीपोत्सवाचा सोळावा दीपोत्सवी प्रवास; सरहद परिवारातर्फे महाराष्ट्रातील १४ ऐतिहासिक ठिकाणी दीपप्रज्वलन!

पुणे, उमेश आबनावे(जिल्हा प्रतिनिधी) : दिवाळीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून सरहद परिवाराच्या वतीने यंदा ऐतिहासिक राजगडावर सोळाव्या वर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजगडावर सुरू झालेल्या या उपक्रमाला आज…