नांदेड ग्रामीण : पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीने पोलीस ठाण्यातच संपवले जीवन

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीने सायंकाळी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय सुरेश नामक व्यक्तीने आज सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पत्नीचा खून केला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.दरम्यान, पोलीस ठाण्यात असताना सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास आरोपीने आत्महत्या केली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, कस्टडी डेथच्या प्रोटोकॉलनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

दाजीपूर जंगल सफारीत पर्यटकांना वाघाचे दर्शन; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

कोल्हापूर,राजन शेळके (प्रतिनिधी) : दाजीपूर अभयारण्यात जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना २ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सफारी मार्गावर वाघाचे दर्शन झाले. अचानक वाघ दिसल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.…

दिवाली से पहले थमी लालपरी की रफ्तार! ST कर्मचारियों का आंदोलन शुरू

दिवाली का त्योहार हो और घर लौटने की तैयारी कर रहे लोगों के सामने बसों की चिंता खड़ी हो जाए, तो सफर का पूरा गणित बिगड़ सकता है। महाराष्ट्र में…