दाजीपूर जंगल सफारीत पर्यटकांना वाघाचे दर्शन; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

वनविभागाच्या नियोजनाला यश; मर्यादित वाहनसंख्या, निश्चित वेळ आणि पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांचे दर्शन सुलभ

कोल्हापूर,राजन शेळके (प्रतिनिधी) : दाजीपूर अभयारण्यात जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना २ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सफारी मार्गावर वाघाचे दर्शन झाले. अचानक वाघ दिसल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

दाजीपूर अभयारण्यात वन्यजीव विभागाच्या वतीने जंगल सफारीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सफारीसाठी वाहनांची संख्या मर्यादित व निश्चित करण्यात आली असून, वेळेचेही बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे जंगलात मुक्तपणे वावरणाऱ्या वन्यप्राण्यांना होणारा त्रास कमी झाला आहे. परिणामी पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन होण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत जंगल परिसरात गवत कुरणांचा विकास करण्यासह विविध कामे करण्यात आली आहेत. तसेच अभयारण्य क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी २० पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांसाठी बोअरवेलची व्यवस्था करून सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत आहे.

जंगल सफारीसाठी सकाळी सहा आणि दुपारी दोन वाजता अशा निर्धारित वेळेतच मर्यादित वाहने सोडण्यात येतात. प्रत्येक वाहनासोबत गाईड किंवा मार्गदर्शक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मार्गदर्शक पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या निरीक्षणाबाबत योग्य माहिती देतात. दुपारचा वेळ हा वन्यप्राण्यांच्या विश्रांतीचा असल्याने निर्धारित वेळेतच सफारीचे नियोजन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांना कमीत कमी त्रास होऊन पर्यटकांनाही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दर्शन घेता यावे, या उद्देशाने वनविभागाने केलेल्या नियोजनाला आता यश मिळताना दिसत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

दिवाली से पहले थमी लालपरी की रफ्तार! ST कर्मचारियों का आंदोलन शुरू

दिवाली का त्योहार हो और घर लौटने की तैयारी कर रहे लोगों के सामने बसों की चिंता खड़ी हो जाए, तो सफर का पूरा गणित बिगड़ सकता है। महाराष्ट्र में…

नांदेड ग्रामीण : पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीने पोलीस ठाण्यातच संपवले जीवन

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीने सायंकाळी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८…